′‘विकसित भारत–रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण)’ व पेसा कायद्यावर एक दिवसीय कार्यशाळा व पंच संमेलन.
गडचिरोली, दि. ३ सप्टेंबर : ग्रामसभा ही गावाच्या विकासाची महत्त्वाची आधारशिला असून, ग्रामसभांना सक्षम करून स्थानिक गरजांनुसार विकासाचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.
VB–G RAM G व पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयोजित कार्यशाळेत रोजगारनिर्मिती, आजीविका बळकटीकरण, ग्रामसभा व ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण आणि लोकसहभागातून ग्रामीण विकास याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी व्हिडिओ संदेशातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी रोजगाराच्या संधी, स्थानिक गरजांनुसार नियोजन आणि ग्रामसभांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर दिला.
शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व परिणामकारक पद्धतीने काम करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
